संपादक:- लक्ष्मण गणेश महाजनी.
प्रकाशक:---- रामचंद्र आत्माराम
द
श्री साईली करी ५ टर्नर रोड बद्रि, बी. बी. रेल्वे.
श्री साईनाथ पमत्रः
श्री साईलीला
मामिक पुस्तक.
वर्ष १ ले.] श्रावण शके १८४५ [ अंक ६ वा.
क्षणमणि सरजन पंगतिरेका भवति भवावर नौका
महाराजांचे अनुभव...
स्फुट विषय...
अनुक्रमणिका.
... ५२-५९
... २३-४०
१०९-१२४
येतील.
श्री साईसच्चरित
या अंकात दोन पृष्ठे जास्त दिली आहेत ती पुढे कमी करण्यांत
सालमजकुरों गोकुळ अष्टमी निमित्ते शिर्डी येथील कार्यक्रम खालील प्रमाणे ठरला आहे:-
श्रावण कृ० प्रतिपदा सोमवार तारीख २७ आगष्ट रोजी नाम सप्ताह सुरू होईल व श्रावण कृष्ण ९ मंगळवारी सकाळी नित्याप्रमाणें काकड आरती होऊन समाप्त होईल. प्रतिपदेपासून अष्टमी पर्यंत रोज हरिभक्तिपरायण बाबुराव युवा औरंगाबादकर यांचे कीर्तन होईल.
श्रावण कृष्ण ८ सोमवारी मध्यरात्रीं श्रीकृष्ण जन्मोत्सव होईल.
श्रावण कृ. ९ मंगळवारी दिवसा भंडारा होऊन रात्री दिंडया वगैरे समारंभाची मिरवणूक निघेल.
श्रावण १० बुधवारी काला होईल.
या उत्सवाप्रीत्यर्थ कोणाला कांहीं पाठविणें असल्यास तें रा. रा. तात्या गणपत पाटील कोते यांचे नावे में || शिरडी, पोस्ट राहतें जिन अहमदनगर येथे पाठविलें जावें.
महारा
( १४ )
अनुभव
एकदां माझे एक स्नेही महाराजांचे दर्शनास आले व तेथें बसल्या- बर महाराजांचे पाय दावं लागले. पाय दावतां दावता महाराज एकदम त्यांना म्हणाले " पाय दाबू नकोस सरकून बैंस त्याप्रमाणें ते गृहस्थ
मार्गे सरकले. थोडया वेळाने त्यांचे डोळे भरून आलेले दिसले. स्थावर थोडा वेळ गेला व मग ते पुनः पाय दावं लागले. त्या वेळी महा-
राज कांही बोलले नाहीत. नंतर ते स्नेही वाड्यांत आले तेव्हां सांग लागले की, पहिल्यांदा पाय दाबीत असतां एक अमंगळ विचार माझे मनांत आला व तत्क्षणीच महाराजांनी मला सरकून बसायला सांगितलें. मग मला व्याबद्दल पश्चाताप झाला व मनांतल्या मनांत महाराजांची क्षमा मागितली. त्यानंतर पुन्हां पाय दाबू लागलों तो महाराजांनी कांहीं मनाई केली नाही. अशाच तऱ्हेचे अनुभव महाराजांचे भक्तांना नित्य येत. अर्थात् महाराजांची शिक्षण पद्धति अवर्णनीय होती.
(१५)
॥ श्रीसद्गुरु साईनाथ प्रसम ||
एकदा गी सकाळी नित्याप्रमाणें महाराजांचे दर्शनास गेलो तेव्हां महाराज चुनीपाशी उभे होते. मी जाऊन पायां पडताक्षणीच महाराज म्हणाले "अरे काळजी तुला कसली. सगळी काळजी मला आहे" मो पुन्हां नमस्कार करून म्हटलें "खरेंच सगळी काळजी आपल्यालाच आहे." महाराजांना आमच्याबद्दल आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काळजी आहे याचे नित्य अनुभव येत असल्यामुळे महाराजांचे बोलणें अक्षरशः पटलें. तरीपण हे शब्द आज महाराजांनी कां उच्चारिले या बदल खुलासा होईना. तो खुलासा मी मुंबईस गेल्यावर झाला. ज्या दिवश महाराजांनी हे शब्द उच्चारिले त्याच दिवशी माझी गुलगी पार्ल्यास माझ्या घरी दिवाणखान्यांत खेळत असतो कोपन्यांत असलेल्या कपाटावर चढू लागली तोंच तें कपाट तिच्या अंगावर आलें. ती खालीं पडली व कपाट तिब्यावर पडलें, कपाटावर कांचेची व धातूची खेळणी होती पण
143
श्रीसाई लीला.
सर्वस्वी काळजी वाहणान्या मालकाची अशी कांहीं कृपा की, ती सर्व खेळणीं जणूकाय उचलून बाजूला ठेविल्यासारखी आणि मुलीला यत्किंचितही इजा झाली नाहीं. नाहीं म्हणावयाला तिची एक बांगडी पिचली व तिचा हात त्यामुळे थोडासा खरचटला.
असेच एकदा तीच मुलगी रात्रीं शौचकूपांत गेली तो तेथे एक मोठा साप होता, मुलीचें वय तेव्हां पाच वर्षांचे होते. साप तिने पहाण्याचे पूर्वी तिच्या बरोबरच्या गड्यानें पाहिला व त्याने तिला ताबडतोब उच लून बाहेर नेली.
(१६)
डहाणूचे उद्धवेशबुवा कांही मंडळी घेऊन एकदां द्वारकेस यात्रेला गेले होते. मुंबईहूनच आगबोटीने गेले. सर्व मडळीची टिकीटे बुबांचे जवळ होती. टिकिटांचे दोन भाग असतात, एक बोटीच्या टिकिटाचा व दुसरा मचव्याचे टिकिटाचा. बुवांनीं मचव्याची टिकिटे वेगळी फाडून एका खिशांत ठेविली व बोटीची टिकीटे आपल्या पैशांच्या पाकिटांत ठेविलीं. आगबोटीवर असतांना ते पैशांचे पाकिट त्यांना कांहीं कारणास्तव बाहेर काढावे लागले. त्यावेळी ते कठड्यापाशी उभे होते. पाकीट काढतां काढत तें समुद्रांत जाऊन पडलें अर्थात बोटीची सर्व टिकिटं व बुबांचे पैसे, सर्व समुद्रांस्तृप्यंतु झाले. बोटींतून उतरतांना टिकिटे यात्री लागतात बुवांनी टिकिट कलेक्टरांस वरील मजकूर सांगितला व टिकिटे घेतली होती या गोष्टीचे प्रत्ययासाठी मचव्याची टिकिटं दाखविली तितक्याने टिकिट कलेक्टराची समजूत झाली व त्याने कोणत्याहीं तन्हेने अडविलें नाहीं. द्वारकेस उतरल्यावर गोमती स्नानाला, देवाच्या चरण स्पर्शाला, पूजेला कर यावा लागतो. बुबांजवळ अर्थात पैसे उरले नव्हते व महाराजावर अढळ श्रद्धा असल्यामुळे " तुजवांचुनि इतराते दिन मुख पसरोनि काय मागावें" या पंतोक्तिप्रमाणे कोणाजवळ न मागतां शिडीस महाराजांस पत्र लिहिले ज्या दिवशीं द्वारकेस बुवांनी पत्र लिहून टाकिलें त्याच रात्री महाराज डहाणूच्या एका धनिक भक्ताच्या स्वप्नांत गेले व त्याला पाकीट समुद्रांत पडल्याची हकीगत सांगून बुबांस ताबडतोब पैसे पाठविण्याची
महाराजांचे अनुभव.
५४
आज्ञा केली. या भक्ताने दुसरेच दिवशीं इन्सुअर करून पन्नास रुपये बुवांस पाठविले व स्वप्नाचा मजकूर लिहिला.
( १७ )
शंकरराव क्षीरसागर मामलतदार हे एकदां महाराजांचे दर्शनास आले असतां महाराजांनी दक्षिणा मागितली. त्यांनी खिशांत असलेले सर्व वैसे महाराजांचे हातांत दिले. वाडयांत आल्यावर त्यांना कोणी विचारिलें की 'तुम्हांला परत जाण्यास पैसे कोठें आहेत, शंकरराव म्हणाले बाबा देतील. त्याच दिवशी संध्याकाळी राहत्याचे पोष्टमास्तर आपल्या एका पाहुण्याला वेऊन तेथे आले. त्या पाहुण्याला शंकररावांनी श्रीस रुपये काही वर्षांपूर्वी उसमें दिले होते, तें त्यानें त्या दिवशी न मागतां शंकररावांना परत दिले. अर्थात शंकररावांची सर्व बेगमी तेवढ्यानें झाली.
(१८).
महाराजांनी देह मंगळवार ता. १५ अक्टोबर १९१८ रोजी तिसरे प्रहरी ठेविला. त्याच दिवशी रात्री ते येथील लक्ष्मण भटाच्या स्वप्नांत गेले आणि म्हणाले बापुसाहेब जोग माझी काकडआरती करावयाला येणार नाहीं, कारण त्याला वाटतें कीं मी मेलों. मी जिवंतच आहे. तूं येऊन माझी काकडआरती कर. स्वप्नांत आज्ञा झाल्याप्रमाणे पहांटेस लक्ष्मण मशिदित गेले कारण बाबांचा देह ते दिवशी मशिदीतच ठेविलेला होता. व त्यानं जाऊन तेथे आरती केली. त्यावेळी बाबांचा हात हालत होता अता कियेकांना भास झाला. दोनप्रहरी आरती नित्याप्रमाणे मशिदीत झाली व संध्याकाळी म्हणजे ता. १६ रोजी बाबांचा देह बापूसाहेब बुट्टींचे वाडयांत आणून ठेविला आणि तेथें त्या रात्री शेजारती झाली आणि तेथे नित्याप्रमाणे काकडआरती, दोन प्रहरची आरती, संध्याकाळची आरती व शेजारती हा क्रम सुरु झाला तो अद्याप चालला आहे.
. (१९)
महाराज समाधिस्त झाल्यावर दोन तीन दिवसांनी सांटाक्रूझच्या मोरेश्वर- राव पवानांच्या मेहणीचे स्वप्नांत गेले व म्हणाले, तुझ्या टकांमध्ये पिवळा
५५
श्रीसाई लीला.
पितांबर आहे तो माझ्या समाधीवर घालण्यासाठी पाठवून दे. त्या बाईनें तो पितांबर पुष्कळ वर्षांपूर्वी वाजूस ठेवून दिला होता व तिला त्याचे स्मरणही नव्हते. सकाळी उठल्यावर बाईने आपले स्वप्न मोरेश्वर रावास सांगितले व ताबडतोब दूं कामधून पितांबर काढून शिर्डीस पाठविण्यासाठी त्यांचे स्वाधीन केला. तो हल्ली येथे आहे व मधून मधून महाराजांचे समा- धीवर घातला जातो.
( २० )
एके दिवशी पहाटेस लक्ष्मणराव उर्फ काका महाजनी यांचे स्वप्नांत महाराज गेले व म्हणाले " निजलास काय, उठ माझा आज तिसावा दिवस आहे तो कर " महाजनी जागे झाले व त्यांना वाटले की, तिसावा दिवस तर केव्हांच होऊन गेला असेल, तरी पण त्यांनी दिवस मोजले ब त्यांना असे आढळून आले की तोच तिसावा दिवस आहे. त्यांनी ब्राह्म- णाला बोलावून महाराजांच्या पादुकांना अभिषेक करविला आणि कांहीं भक्तमंडळीस जेवावयास बोलावून महाराजांची प्रथम मासिक पुण्यतिथि साजरी केली. त्यानंतर प्रत्येक मासिक पुण्यतिथि मुंबईस साजरी कर ण्यांत आली.
( २१ )
श्रीसाईबाबांच्या कांहीं लीलाबद्दल
रा. रा. गणेश गोविंद नरके यांचे रा. रा. हरी सीताराम दिक्षित यांस आलेल्या ता० ४।३।१९१८ चे पत्रांतील उताराः
परत्राचे दिवशी (ता. २ मार्च १९१८) नाथषष्टी (श्री एकनाथ महाराजांची पुण्यतिथी ) झाली. दुपारी बहुतेक मंडळीना बाबांनी आजी- बाईच्या पुराणास पाठविलें, तेथें बाईनीं रसाळ वाणीनें नाथांचे चरित्र सांगितले तिकडे न्याहारीनंतर बाबांनी कांही गोष्टी सांगितल्या स्यांत नामदेव व कबीर ह्यांचा उल्लेख होता सायंकाळी भाकरीचे वेळीं बाया तात्याशी भांडले; भाकरीचें ताट फेंकून दिलें व सावण्या भरविणे, फळें खार्णे वगैरे होण्यापूर्वीच समर्थांनी नारसिंव्हाचा अवतार घेतला. बाड-
महाराजांचे अनुभव,
"
५६
तून फकीरबाबा, डॉक्टर वगैरे मंडळी स्वरूप पहावयास देवळांत गेली होती; दादांला म्हणायें " ह्याला (तात्याला ) हाकून दे नाहींतर मीच खाली जातों " आवेशांतच चौरंगाजवळ जाऊन तात्याला मारावयाला दोन धोंडे घेतले व बरेच संतापले तात्या खाली आला; परंतु त्यानें " फळें खाऊं घातल्याशिवाय चावडीत जाऊ देणार नाहीं. असा हट्ट घेतला. संध्याकाळी ८-४५ ला घंटा झाली व सर्व मंडळी जमली, भजन सुरू झालें
• पण तात्या रुसला. बाबांनी दादाकडून तात्याला बोलावं पाठविलें. पण तात्या हट्ट सोडीना व बाबा फळे खाण्याचे कबूल करीनात. ९-३० झाले, १०-३० झाले, मंडप स्त्री पुरुषांनी गच्च भरला, पालखी तयार करून ठेवली. घोडा फाटकाजवळ उभा राहिला व भजनाचा कडाका उडून राहिला. बाबा गादीजवळून उठून चौरंगाजवळ आले व नंतर खांबाजवळ जाऊन बसले. बाबा शांत होते व कांहींच बोलत नव्हते. जिल्हे पैठणांत पालखी निघेपर्यंत बाबा उशीर करणार असें जो तो बोलं लागला व जणं काय पैठणांतच आहोत असे समजून मंडळी कडाक्यानेंच नाचून भजन करूं लागली. ११ वाजले व दादांनीं घरी जाण्याची परवानगी मागितली, बाबा म्हणाले "कुठे जातोस वैस" ह्यानंतर बाबा, विमारीत एकदा दरबार केला होता तसाच करितात कीं, काय असें वाटू लागलें. फरक हा कीं, त्या दिवशीं अतिशय शांतता होती व ह्या दिवशी मंडपांत भजनाचा कडाका उडून जिकडे तिकडे आनंदी आनंद होऊन राहिला होता. दोन्हीही चावडीचे दिवस होते. शेवटीं तात्यानी आपला हट्ट सोडला. तात्यांनी हट्ट सोडल्यावर बाबा हट्ट धरून बसले “ नाहीं जायचं " असे म्हणत, दादाला म्हणाले " बरं वा फार रात्र झाली जा आता" भजनाला व भटे लोकांनां शिव्या देऊन भजन बंद करविलें. म्हाळसापतीला म्हणाले "चल आपण तक्यांत जाऊं " तात्या वर गेला त्याला सर्व मंडळीस हांकून देण्यास सांगितलें. काही वेळाने तात्यालाही जावयास सांगितले सर्व मंडळी घरोघर गेली. बापूसाहेबही गेले, समर्थ (आम्ही मी, खडको बगैरे मशीदीतच होतों ) गादीवर बसून पुन्हां संतापलें, व शिव्या देऊ लागले बहुतेकांचा उच्चार झाला त्यांत आपलेही नांव होतें. शेवटी दोन प्रहर रात्रींस ( वाराचे सुमारास ) " चला " असे म्हणाले बाईघाईनें घंटा पन्हा
66
५७
श्रीसाई लीला.
वाजविली. तात्या व बापूसाहेब आले व वहिवाटीप्रमाणे चावडी फार आनंदाने झाली. नाथ षष्टीचीच हो लीला होय, असे सर्वांना वाटत होतें. दुसरे दिवशी सकाळी बैठकीचे वेळी ह्याच्याच गोष्टी होत्या. त्या वेळी गोष्टी बन्याच लांबल्या. उठावयास १०.३० वाजले. भिंतीजवळ तात्या आला; तात्या म्हणाला " काय बाबा आम्हाला नीट सांगितलं असतं की, दोन प्रहर रात्रीपर्यंत भजन करा म्हणजे जाऊं, तर कां आम्ही ऐकलं नसतं. " " उई खेलाडू " बाबा म्हणाले " तुम्हीच तुम्ही अन् बापु- साहेब हरदम खेले आहांत " लेंडीवरून परत जातांना लोकांनां बाबा विचारीत होते " काल का उशीर झाला होता!" असो इथे फार आनंद आहे.
(२२)
रा. रा. मोरेश्वरराव प्रधानांचा मोठा मुलगा एकदां बराच आजारी होता. त्या वेळीं त्यांच्या एथें एक तेलंगी शास्त्रीबुवा राहत असत. ते शास्त्रीबुवा श्री दत्तउपासक होते. त्यांना मोरेश्वरराव श्री सांई महारा- जांचे भजनीं लागले हैं पसंत नव्हते. ते म्हणाले तुम्ही बाबानां सोडा व श्री दत्ताला शरण जा म्हणजे तुमचा मुलगा बरा होईल. प्रधान म्हणाले बाबा हे दत्तच आहेत. शास्त्रीबुवा म्हणाले जर हा मुलगा पांच मिनिटांत दूध पिऊं लागेल तर बाबा दत्त आहेत असें मी मानीन व उद्यां पासून मुलाला आराम बाटू लागून लौकरच बरा होईल तर मी बाबांचे दर्शनास जाईन व सवाशें रुपये दक्षिणा देईन त्या मप्राणें पांच मिनिटांतच मुलगा पिऊं लागला व दुसरे दिवसापासून त्याला आराम पडू लागला. मुलगा साफ बरा झाल्यावर शास्त्रीबुवा शिर्डीस महाराजांचे दर्शनास गेले सवाशें रुपये दक्षिणा दिली. नंतर तिसरे प्रहरी महाराजांनीं पांच रुपये दक्षिणा मागितली. तेव्हां माधवराव देशपांडे महाराजांस म्हणाले "सकाळी यांनी सवारों रुपये दिले आता आणखी पांच रुपये कशाला !" महाराज म्हणाले "सवाशे रुपये दिले ते त्यानें आपल्या दत्ताला दिले. ते मला कोठें दिले !" शास्त्रीबुवांनी मागितल्याप्रमाणें पांच रुपये दिले.
दूध
महाराजांचे अनुभव.
५८
मनास आल्यास श्रीसाईबाबा आपल्या सभोवार बसलेल्या भक्त
वृन्दास
मोठ्या आनंदाने अनेक गोष्टी सांगत त्यांतील कांहीं खालीं दिल्या आहेत.
त्या पर्णेप्रमाणे.
(२३)
एका माळ्या कुणब्याचा मुलगा होता. तो वाडयांत आला. तेथेंच तो वाढला. बारा वर्षे राहिल्यानंतर रडूं लागला. घरीं आईबापाकडे जाण्यासाठी रडं लागला. त्याला बादशहाने सांगितले. आपल्या आवारांत पुष्कळ वाडे आहेत. त्यांतल्याच एखाद्या वाडयांत रहा असें त्याला सांगितले. वाडा त्याला दिला. तो पुनः रडूं लागला. मग बादशहानें आपल्या मुलीशीं त्याचें लग्न लावून दिलें या मुलीला पोर झालें नाहीं, म्हणून त्याने माळपाकुणब्याची मुलगी तिष्याशीही अन लावले. तरी फिरून रडं लागला. बादशहानें पुष्कळ समजाविलें तरी तो गेला. मग बादशहाने त्याला कांहीं द्रव्य दिले कारण बादशाह मोठाच माणूस होता. त्याचे नांव राहिलें आहे.
तात्पर्य बादशहा इतका जीव देत होता. वाडा दिला. आपली मुलगी दिली तरी आईबापाकडे जाण्याची म्हणजे संसारांत पडण्याची ओढ गेली नाही. बादशाहा मोठा माणूस होता म्हणून त्याला कांहीं द्रव्य दिले. पण जर बादशहाचे ऐकलें असतें आणि राहिला असता तर राज्य मिळाले असतें.
( २४ )
चार भाऊ होते. त्यापैकीं दोघे एका गांवाला गेले. ते माळी कुणबी होते तेथे एक जाणती मुलगी होती. ती कबिराची होती. तेथें त्यांनीं कांही सणगे घेतली. नंतर त्या मुलीला खुणावलें. ती गेली. तिला घेऊन ते आपल्या गांवी गेले. मी लहान होतो. मीबी संगें गेलों. गांवी गेल्यावर लोकांनी चौकशी केली व भय घातले. मग ते दोघे त्या मुलीला घेऊन एका डोंगरांत गेले. मीही मागोमाग गेलो. त्या मुलीला दोन बच्चे झाले
तिथ्या आईबापाला शोध लागला. कांहीं मंडळी म्हणाली पोरीला
५९
श्रीसाई
घेऊन चला व या लोकांना मारून टाका. आईबाप म्हणाले पोरीला बच्चे झाले आहेत. आतां राहू या.
(२५)
तूप
एक वाणी होता. त्यानें तुपाचीं तीन भांडी भरली. माझा म्हतारा जवळ होता तो म्हणाला माझ्यापुढें भांडी ठेवशील तर मी सगळे एकटा खाईन. तितक्यांत वाण्याचा भाऊ त्याला जेवावयास बोलावयाला आला बाण्याने तुपाची भांडी आंत दुकानांत ठेऊन कुलुप लावले. माझ्या म्हातान्याला वाणी म्हणाला मी जेऊन आलों म्हणजे तुम्हाला फुटाणे देईन. मी म्हातान्याजवळच होतों. दुसरी दोन पोरें होती त्यांनी मागची भिंत पडकी होती. तिला एक लाथ मारली तो भिंत पडली व सगळे मोकाट झाले. मग त्या दोन पोरांनी दोन भांडयांतलें तूप पार केलें म्हातान्याने मला इशारा केला मग मी तिसन्या भांडयांतलें तूप पार केलें. दुकानदार परत आला त्याला मी तुपाचे सांगितले. दुकानदार पाहतो तों कांही सोनें वगैरेही नाहीसें झालें. मग आम्हाला सगळ्यांना चावडीवर नेलें. खरा चोर सांपडला आम्हाला सोडून दिलें मग आम्हांला हगवण लागली तो सगळें तूपच हगूं लागलों मग माझ्या म्हातान्याने मला नीट केलें. त्या वाण्यानें पुढे मला दोन वर्षे जेऊ घातलें.
स्फुट विषय.
श्रीसद्गुरु साईनाथ प्रसन.
शके १८४५ च इसवी सन १९२३ च्या रामनवमीच्या उत्सवा- बद्दल दास गणू महाराज यांनीं श्री चरणों सादर केलेले पत्र:-
श्री सच्चिदानंद सद्गुरु आधुनिक संतचुडामणी भक्तकाम कल्पद्रुम श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्या पवित्र चरणावरविंदी श्रीराम नव- मोध्या जमाखर्चाची व उत्सवाची हकीगत सादर करितों ती:-
(१) या उत्सवास अष्टमीपासून आरंभ होऊन द्वादशीस काला केला. उत्सवाची समाप्ती झाली. कांहीं पुर्तता होणें राहिली होती ती पोर्णीमेस केली. असा एकंदर ६ दिवस उत्सव झाला.
(२) या उत्सवास पाहुणे मंडळी आली ती :-
श्रीमंत आण्णासाहेब बोराळकर, रावसाहेब माझोडकर, श्रीमंत आप्पासाहेब नार्नाळकर, जनार्दन अण्णा, गोविंद व्यंकटी महाजन, बाबा रामचंद्र पत्तेवार व त्यांचे गुमास्ते मंडळी, नागोबा, पापा छाला, नारायण, व्यंकोबा, बाबा श्रीमंत सरकार बुळे साहेब मंडळीसह व राणी साहेबांसह, नानासाहेब पाडकीकर, जिवन लाल गंगाराम शेटजी, भगवा- नराव मानरमकर, रामचंद्रराव वकील वरुडकर, दादासाहेब बरुडकर, अशी मंडळी समक्ष हजर राहिली.
(३) अडचणीमुळे समक्ष न येता आल्यामुळे ज्यांनी उत्सवांत भाग घेतला ती मंडळी धोंडोपंत वकील, बळवंतराव खेडकर, शंकरराव- मुळात्रेकर,
(४) आतां उत्सवास मुंबईकडील मंडळी आली ती:--
रावसाहेब दाभोळकर, काकासाहेब दीक्षित, रावसाहेब तर्खड, पुर्णचंद्रभय्या, बुढी, आपल्या मंडळीसह पुरंदरे, पुण्याचे दुकानदार रा. शिंदे, माळी, आंधेरीकर वेंडर, मास्तर, सुंदरराव नवलकर-
(५) आता उत्सवास सहानुभूती दर्शविलेली मंडळी. बाळासाहेब रेगे, नारायण जनार्दन तेंडुलकर, काकासाहेब महाजनी, जनाबाई
२४
श्रीसाई लीला.
कोठारे, मनमोहन रंगनाथ जयकर, वसंतराव, काका पाटील, श्रीकृष्ण पुरषोत्तम. भवानराव बनसोडे.
जमा
(६) आतां ह्या उत्सवास खर्च झाला त्याचा तपशील:-
रु. खर्च
रु.
७२-०-० आपला चरणरज
२१०
दासगणू, २५ रु. रोख
जरीचा हमाल २७.
रामचंद्र आनंदरुप मारवाडी साखर कणिक रवा तांदुळ डाळ वगैरे सामान पावती बरहु०
४ उपरणी २०रु.
४०००
पंढरपुरकर आचारी
७५०० राजेसाहेब माझोडकर ११५०० दारुवाला शेख अहमद
५०.०० गोविंद व्यंकटी महाजन. आकोलकर पावती वरहु
५००० बाझा रामचंद्र पत्तेवार २२००
कासम फकिर बाजेवाला
१५-०-० धोंडोपंत वकील. ११-०-० १०० शंकरराव मुळावेकर. १०० बळवंतराव खेडकर.
११००
५-४-६
विठोबा सुतार सर्पणा व तेली तुकाराम
१०.०००
यमाजी जगताप दूधाबद्दल
५-०.० आंधेरीकर वैर.
६-०-०
भाजी
५-०-० आंधेरीकर मास्तर.
१०.०००
१० ०० वायुभय्या कोठारी.
रामनवमीच्या
अभिषेकाची दक्षिणा
५१-०- बुळेसाहेब
५-०-०
आंधळे आणि पांगळे
५-०-० सुंदरराव नवलकर
यांचीद क्षिणा.
५०० काकासाहेब दिक्षितांची बहीण २७-१४० श्रीचा समाधी खर्च,
१५.०० चौवळ
५.००:
५-०-० सीताबाई रामचंद्र सामंत. १-८-० १०० यशवंतराव अर्नाळेकर ५-०-० १०-०-० बाबा सामंत. ५-०-० चिंतू शेट
पावती बरहु
भोजन दक्षिणा खर्च
म्हाळसाकांताचा फराळ नाना चोपदार उपरणे पान बाळा शिंपी,,, [१ रु.५
५.०.०
७-०.०
लक्ष्मण भट उपरणें पान १
रु. ७
१००-०० पापायाल
१७००० बाबा वर्माधिकारी रामा-
१०-०-० नागोबा वंजारी
स्फुट विषय.
यणाचे पारायणाची
१ तुपाचा डबा रु. ३० पा.द.रु.१० जरीचा रुमाल रु.२७
३० ० ० व्यंकोवा वंजारी
तुपाचा डबा.
४०-०-० लक्ष्मीबाई जोगळेकर
तांदुळाचें पोतें
२-०-०
आध्यान्याला बैलगाडी भाड
२-०-०
विडयांची पार्ने.
घासलेट डबे २
९००० दादा साहेब वरुडकर. ८-८-०
उपरणे जोडी १ची किंमत २१२० चिमण्या ४
९०० रामराव वरूड कर १-८-० घरे सारविण्यास
"
५०० गांधी १ गुळाची ढेप
८-०-० नारायण बंजारी उपरणे जोडी १
४-८-० बाबारंगारी पत्रावळी
१|| हजार ३ रु. प्रमाणें
मोलकरीण व गडी यांची मजुरी.
१-०-०
भांडी घासणारीण कोळीण
कुंभार आनाजी वागरी
१५.०० पापालालची सासू. ४-४० दत्तोपंत इंगोलीकर. ५००० हनुमंत जयंतीप्रीत्यर्थ. उपरणे जोडया ५ एकंदर किं ५०
६७५-१२० एकूण जमा.
९७-१००खूट आली ती भरण्याकरितां
७७३-६-०
२-०-०
रांजण माखे परळ मिळून ६०० नानू चहावाले संगमनेर- कर उपरण्याचे पान
६०० सुरुदिन घोडेवाला उपरण्याचे पान १
६-०-० अबदुल उपरण्याचे
पान १
५-०-० मार्तंड भगत
४-८-० रंग्यागुरव,
४-८० मुरल्या "
६.००० बाळा गुरव,"
४-०-० महादु फसले,
४-८-० सुरदास,
४-८-० रगतपीते
पाने
१-८-० आनंदागास्तर पान १
१०९ ८ ० बंदी प्रयोजन खर्च
२५
२६
श्रीसाई लीला.
१-०-० हनुमंत जयंति प्रीत्यर्थ
अभिषेक खर्च.
१५-०-० आग्यान्याला जरीचा
रुमाल बांधला
१०० हरभरे बगैरे यांची डाळ
नारळ शेंदूर
५०.००० महार मांग भिल चांभार
यांना भोजन
७७३.६ ० एकूण ग्वचे.
एणेप्रमाणे खर्च झाला आहे. यांत पेटीची जमा हगाम्याचा खर्च व तमाशाचा खर्च दाखविला नाहीं. तो तात्या पाटलास माहित आहे.
(७) आतां आपल्या या उत्सवात ज्यांनी यथाशक्ति गदत केली. त्यांना आपल्या कडोन इहपर लोकाचा उत्तम आशीर्वाद असावा ब त्यांचे आपण रक्षण करावें. मोगलाईत नांदेड, मुखेड, उमरी, कुंठूर, कळ बाजुरी, चोपाळे, रामेश्वर, सांगवी, सातेगांव, नायगांव, कोकलेगांव नार्नाळी, अशा गांवीं तुमची मंडळी आहेत. त्यांचे आपण रक्षण करावें. आपली आम्ही पिलें आहोत. आपल्या सुखदपंखांखाली आमचे सर्वदा रक्षण व्हावे. झालेला खर्च चरणी सादर केला आहे. कळावें सेवेश श्रुत होय हे विज्ञापनाः न्यूनाधिकाची क्षमा करावी.
आपला चरणरज,
दासगण
स्फुट विषय.
ह. भ. परायण दासगणूकृत श्रीसाईनाथ स्तवन मंजिरी
२७
श्रीगणेशायनमः । हे सर्वाधारामयूरेश्वरा । सर्वसाक्षी गौरी कुमरा ॥ हे अचिंत्या लंबोदरा | पाहिमां श्री गणपते ॥ १ ॥ तूं सकल गणांचा आदि ईश । म्हणून म्हणती गणेश ॥ तूं संमत सर्व शास्त्रांस । मंगलरूपा भालचंद्रा ॥ २ ॥ हे शारदे वाग्विलासिनी । तूं शब्द सृष्टी स्वामिनी ॥ तुझें अस्तित्व म्हणूनी । व्यवहार चालती जगताचे ॥ ३ ॥ तूं ग्रंथकाराची देवता । तूं भूषण देशाचे सर्वथा || तुझी अवघ्यांत अगाध सत्ता । नमो तुजसीं जगदंबे ॥ ४ ॥ हे पूर्णब्रह्मा संतप्रिया । हे सगुणरूपा पंढरीराया || कृपार्णवा परम सदया। पांडुरंगा नरहरे ।। ५ ।। तूं अवघ्यांचा सूत्रधार । तुझी व्याप्ती जगभर || अवधीं शास्त्र विचार | करिती तुझ्या स्वरूपाचा ॥ ६ ॥ पुस्तकज्ञानी जे जे कोणी । त्यां तूं न गवससी चक्रपाणी || त्या अवघ्या मूर्खानीं । शब्दवाद करावा ॥ ७ ॥ तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित || | तुला माझा दंडवत । आदरें हा अष्टांगी ॥ ८ ॥
हे पंचवक्त्रा शंकरा । हे नररुंड मालाधरा ॥
हे नीलकंठा दिगंबरा | ॐ मकाररूपा पशुपते ।। ९ । तुझें नाम ज्याचे ओटीं । त्याचं दैन्य जाय उठाउठी || ऐसा आहे धूर्जटी । महिमा तुझ्या नांवाचा || १० |
1
तुझ्या चरणा वंदून । मी हें स्तोत्र करितों लेखन ॥ यास करावें साथ पूर्ण । तूं सर्वदा नीलकंठा ॥ ११ ॥
२८
श्रीसाई लीला.
आतां वंदूं अत्रीसुता ॥ इंदिरा कुलदेवता ||
श्री तुकारामादि सकल संतां । तेवी अवघ्या भाविकांसीं ॥ १२ ॥ जयजयाजी साईनाथा । पतीत पावना कृपावंता ॥
तुझ्या पदीं ठेवितों माथा । आतां अभय असूं दे ॥ १३ ॥ तूं पूर्ण ब्रह्मा सौख्य धामा । तूंच विष्णू नरोत्तमा || अर्धागी ती ज्याची उमा । तो कामारी तूंच कीं ॥ १४ ॥ तूं नरदेह धारी परमेश्वर । तूं ज्ञान नभींचा दिनकर ॥ तूं दयेचा सागर । भवरोगां तूं औषधी ।। १५ ।। हीनदीनां चिंतामणी । तूं तब भक्तां स्वर्धुनी ॥
तूं बुडतियांनां भव्य तरणी । तूं भीतासी आश्रय ॥ १६ ॥ जगाचें आद्य कारण । जें कां विमल चैतन्य ||
ते तुम्हींच अहा दयाघन । विश्व हा विलास तुमचाची ॥ १७ ॥ आपण जन्मरहीत । मृत्युही ना आपणामत ||
तेच अखेर कळून येत । पूर्ण विचारें शोधितां ॥ १८ ॥
। जन्म आणि मरण । हीं दोन्हीही अज्ञानजन्य || आपण दोहोंपासून । अलिप्त मुळींच महाराजा ॥ १९ ॥ पाणी झन्यांत मगटलें । म्हणून कां तेथ उपजलें ॥ तें पूर्वीच होतें पूर्ण भरलें । आलें मात्र आंतुनी ।। २० ।। खार्चेत आलें जीवन । म्हणून लाधलें अभिधान ॥ झरा ऐसें तिज लागून । जलाभाव खायची ॥ २१ ॥ लागला आणि आटला । हें मुळीं न ठावें जला ॥ कांकीं जल खाचेला | देत नव्हतें महत्व मुळीं ॥ २२ ॥ खांचेसीं मात्र अभिमान । जीवनाचा परिपूर्ण ||
म्हणून
तें आटतां दारुण । दैन्यावस्था ये तिशीं ॥ २३ ॥
स्फुट विषय.
नरदेहही खांच खरी । शुद्ध चैतन्य बिमलवारी ॥
खांचा अनंत होती जरी । परी न पालट तोयाचा ॥ २४ ॥ म्हणून अजन्मा आपणां । मी म्हणतसें दयाघना ॥ अज्ञान नगाच्या कंदना करण्या व्हावे वज्र तुम्ही ॥ २५ ॥ ऐशा खांचा आजवर बहूत झाल्या भूमीवर ॥
हल्लीं असून होणार | पुढेही कालावस्थेनें || २६ || त्या प्रत्येक खांचेमत । निराळें नांवरूप मिळत ॥
जेणें करून जगतांत | ओळख त्यांची पटतसे ॥ २७ ॥ आतां चैतान्यमत । मी तूं म्हणणें हें ना उचित ॥
।
कांकीं न जेथे संभवे द्वैत । तेंच चैतन्य निश्वयें ।। २८ ।। आणि व्याप्ती चैतन्याची । अवघ्या जगाठाई साची ॥
।
मग मी तूं या भावनेची । संगत कैशी लागते ।। २९ । जल मेघगभींचें । एकपणे एकसाचें ॥
अवतरणें भूवरी होतां त्याचें । भेद होती अनेक ॥ ३० ॥ जं गोदेच्या पात्रांत । तें गोदा म्हणून वाहिले जात ॥ जें पडे कूपांत । तैसी न त्याची योग्यता ॥ ३१ ॥
संत रूप गोदावरी । तेथील तुम्हीं अहा वारी ।।
२९
आम्हीं थिल्लर कूप सरोवरीं । म्हणून भेद तुम्हां आम्हां ॥ ३२ ॥ आम्हां म्हावया कृतार्थ । आलें पाहिजे तुम्हांप्रत ||
शरण सर्वदा जोडून हात । कां कीं पवित्रता तुम्हां ठाई ॥ ३३ ॥ पात्रामुळे पवित्रता । आली गोदा जलासी सर्वथा ॥ नुसत्या जलांत पाहतां । तें एकपणे एकची ॥ ३४ ॥ पात्र गोदावरीचें । जे कां ठरलें पवित्र साचें ॥
तं उरण्यातद भूमीचे गुणदोष झाले साह्य पहा ।। ३५ ।।
३०
श्रीसाई लीला.
मेघगभींच्या उदकाला । जो भूमी भाग न बदलवी भला ।। त्याच भूमीच्या भागाला । गोदा म्हणाले शास्त्रवेत्ते ॥ ३६ ॥ इतरत्र जें जल पडलें । त्यानें पात्रगुणा स्वीकारलें || रोगी कडूखारट झालें । मूळचें गोट असूनी ॥ ३७ ॥ तैसें गुरुवरा आहे येथ । परिपूची न घाण जेथ ॥
।
त्या पवित्र पिंडामत । संत अभिधान शोभतसं ॥ ३८ ॥ म्हणून संत ती गोदावरी । मी म्हणतों साजिरी ॥ अवघ्या जीवात आहे खरी आपुली श्रेष्ठ योग्यता ।। ३९ ।। जगदारंभापासून । गोदा आहेच निर्माण ||
तोयही भरलें परिपूर्ण । तुटी न झाली आजवरी ॥ ४० ॥ पहा जेव्हां रावणारी । येता झाला गोदातिरीं ॥
त्या वेळचें तेथील वारी । टिके कोठून आजवरी ॥ ४१ ॥ पात्रमात्र तेच उरलें । जल सागर मिळाले ||
पावित्र्य कायम राहिले । जल पात्राचें आजवरी ॥ ४२ ॥ प्रत्येक संवत्सरीं । जुनें जाऊनी नवें वारी ।
येत पात्रा भीतरी । तोच न्याय तुम्हां ठाया ॥ ४३ ॥ शतक तेंच संवत्सर । त्या शतकांतील साधूवर ॥ हेंच जल साचार ॥ नाना विभूती ह्या लाटा ॥ ४४ ॥ या संतरूप गोदेसीं । प्रथम संवत्सरासीं ॥ पूर आला निश्वयेसीं । सनत्सनक सनंदनाचा ॥ ४५ ॥ मागून नारद तुंबर । ध्रुव प्रल्हाद बलि नृपवर || शवरी अंगद वायूकुमर । विदूर गोपगोपिका || ४६ ॥ ऐसे बहूत आजवरी । प्रत्येक शतकामाझारीं ॥
पूर
11
आले वरच्यावरी । ते वर्णण्या अशक्यमी ॥ ४७ ॥
स्फुट विषय.
या सांप्रतच्या शतकांत । संतरूप गोदेप्रत
आपण पूर आळांत । साइनाया निश्वयें ४८ ॥
म्हणून तुमच्या दिव्य चरणा । मी करितों वंदना || महाराज माझ्या दुर्गुणा । पाहूं नका किमपीही || ४९॥ मी हीन दीन अज्ञानो । पातक्यांचा शिखामणी ॥
युक्त अवध्यां कुलक्षणांनीं । परि अव्हेर करूं नका ॥ ५० ॥ लोहा अंगींचें दोष | मना न आणी परीस ।।
३१
गांविंच्या लेंडया ओहोळास । गोदा न लावी परतवूनि ।। ५१ ।। माझ्यामधील अवधी घाण । आपल्या कृपाकटाक्षे करून ॥ करा करा वेर्गे हरण | हीच विनंती दासाची ॥ ५२ ॥ परिसाचा संग होऊन । लोहाचें ते लोहपण ||
जरी न होय गुरुवरा हरण तरी हीनत्व परिसाशीं ॥ ५३ ॥ मला पापी ठेवूं नका । आपणा हीनत्व घेऊं नका ॥
आपण परीस मी लोह देखा । माझी चाड आपणांते ।। ५४ ।। बालक अपराध सदैव करितें । परी न माता रागावते ।।
हे आणून
ध्यानात कृपा प्रसाद करावा ।। ५२ ।। हे साइनाथा सद्गुरु तूंच माझा कल्पतरू ||
भवान्धीचे भव्य तारूं । तूंच अससी निश्वयें ॥ ५६ ॥ तूं कामधेनू चिंतामणी । तूं ज्ञान नभींचा वासरमणी |
सद्गुणाची भव्य खाणी । अथवा सोपान स्वगींचा ॥ ५७ ॥ हे पुण्यवंता परम पावना हे शांत मूर्ते आनंदवना || हे चित्स्वरूपा परिपूर्णा । हे भेदरहित ज्ञान सियो ।। ५८ ।। हें विज्ञान मूर्ति नरोत्तमा। हे क्षमाशांतीच्या निवासधामा ॥ हे भक्त जनाच्या विश्रामा । प्रसीद प्रसीद मजमती ।। ५९ ।।
३२
श्रीसाई लीला.
तूंच सद्गुरू मछिंदर । तूंच महात्मा जालंदर | तूं निवृत्तिनाथ ज्ञानेश्वर । कबीर शेखोनाथ तूं ॥ ६० ॥
।
तूंच बोधला सांवता । तूं रामदास तत्वता ॥
तूंच तुकाराम साइनाथा । तूंच सखा माणिक प्रभु ॥ ६१ ॥ या अपुल्या अवताराची ॥ परी आहे अगम्य साची ॥
ओळख आपुल्या जातीची ॥ होऊं न देतां कवणातें ॥ ६२ ॥
1
कोणी आपणा म्हणती यवम । कोणी म्हणती ब्राह्मण ||
ऐसी कृष्णासमान । लीला आपण मांडिली ॥ ६३ ॥ श्री कृष्णास पाहून । नाना प्रकारें बदले जन ॥
1
॥
कोणी म्हणाले यदुभूषण । कोणी म्हणाले गुराखी ॥ ६४ ॥ यशोदा म्हणे सुकुमार बाळ । कंस म्हगे हा महाकाळ ॥ उद्धव म्हणे प्रेमळ । अर्जुन म्हणे ज्ञानजेठी ॥ ६५ ॥ तैसे गुरुवरा आपणासीं । जे ज्याच्या मानसीं ॥ योग्य वाटेल निश्रयेसीं । तें तें तुम्हां तो म्हणतसे ॥ ६६ ॥ मशीद आपुळे वसतिस्थान विधावांचून आहेत कर्ण ॥ फरियाच्या तन्हा पाहून । यवन म्हणणें भाग तुम्हां ॥ ६७ ॥ तैसी अग्नीची उपासना | पाहूनि आपुली दयाघना | निश्वय होत आमुच्या मना । कीं आपण हिंदू म्हणुनी ॥ ६८ ॥ परी हे भेद व्यवहारीक । यातं चाहतील तार्किक ॥ परी जिज्ञासू भाविक । त्यां न वाटे महत्व यांचं ॥ ६९ ॥ आपुली आहे ब्रह्मास्थिती । जात गोत ना आपणाप्रती ॥ आपण अवघ्यांचे गुरुमूर्तीीं । अहां आद्यकारण ॥ ७० ॥ यवन हिंदूचे विपट आलें । म्हणून तदैश्य करण्या भलें ।। मशीद अग्नीला स्वीकारिलें । लीला भक्तांस दावावया ।। ७१ ।।
स्फुट विषय.
आपण जातगोवातीत । सद्वस्तू जी का सत ।
1
1
तीच तुम्ही साक्षात । तर्कातीत सांचकीं ॥ ७२ ॥ तर्क वितकांचें घोडें । चालेल किती आपणांपुढें ॥ तेथें माझें बापुडें । शब्द टिकतील कोठुनी ॥ ७३ ॥ परी पाहुनी तुम्हाला । मौन नये धरितां मला ॥
३३
कां कीं शब्द हेंच स्तुतीला । साहित्य आहेत व्यवहारीं ॥ ७४ म्हणून शब्द करून जें जें होईल वर्णन ||
तें तें सर्वदा करीन । आपुल्या कृपाप्रसादें ।। ७५ ।। संताची योग्यता भली || देवाहून आगळी |
अजादुजास नाहीं मुळीं । स्थान जवळ साधुंच्या ॥ ७६ ॥ हिरण्यकश्यपू रावणाला । देवद्वेपें मृत्यु आला ||
तैसा एकही नाहीं पडला | प्रकार संत हस्तानें ॥ ७७ गोपीचंदें उकीरडयासी । गाढिलें जालंदरासी ॥ परी त्या महात्म्यासी । नाहीं वाटला विपाद ॥ ७८ ॥ उलट राजाचा उद्धार केला । चिरंजीव करूनी सोडिला ॥ ऐशा संताच्या योग्यतेला । वर्णन करावें कोठवरीं ॥ ७९ ॥
संत सूर्य नारायण । कृपा त्यांची प्रकाशपूर्ण
संत सुखद रोहिणी रमण । कौमुदी ती तत्कृपा ॥ ८० ॥ संत कस्तुरी सोज्वळ कृपा त्यांची परिमळ ||
संत इक्षु रसाळ | रस नव्हाळी संस्कृपा ॥ ८१ ॥ संत सुष्टदुष्टांप्रती समसमान निश्चिती ।।
उलट पाप्यावरी मीती। अलोट त्यांची वसतसे ॥। ८२ ।।
गोदावरी जलांत । मळकट तेंच धुवाया येत ।।
|
निर्मळ ते संदुकींत । राहे लांब गोढे पूनी ॥ ८३ ॥
३४
श्रीसाई लीला.
जे संदुकीमध्ये बसलें । तेही वस्त्र एकदां आलें || होते घ्यावयालागीं भलें । गोदावरीचें पात्रांत ॥ ८४ ॥ येथें संदूक बैकुंठ । गोदा तुम्हीं निष्ठाघाट || जीवात्मे हेच पट । षट्विकार मळ त्यांचा ॥ ८५ ॥ तुमच्या पदाचें दर्शन । हेंच आहे गोदा स्नान || अवध्या मळा घालवून । पावन करणें समर्थ ॥
८६ ॥
आम्हीं जन है संसारीं । मळत आहों वरच्यावरी ॥ म्हणून आम्हींच अधिकारी । संतदर्शन घेण्यास्तव ॥ ८७ ॥ गौतमी माजी विपूल नीर आणि पुणे मळकट घांटावर || तेसेंच पडल्या साचार । त्याचें हीनत्व गोदेसी ॥ ८८ ॥ तुम्ही सघन शीततरूवर आम्हीं पांथस्थ साचार ॥ तापत्रयाचा हा मखर | तापलासे चंडांशू ॥ ८९ ॥ त्याच्या तापापासून सदया। करा रक्षण गुरुराया ॥ सत्कृपेची सीतळ छाया । आहे आपुली लोकोत्तर ॥ ९० ॥ वृक्षाखालीं बेसून । जरी लागतें वरून ऊन ॥
तरी त्या तरूलागून । छाया तरू कोण म्हणे ॥ ९१ ॥ तुमच्या कृपेवीण पाही । जगांत वरं होणें नाहीं
अर्जुनाला शेषशाई | सखा लाला धर्मास्तव ॥ ९२ ॥ सुग्रीव कृपेनें विभीषणा । लाधलासे रामराणा ।। संतामुळेच मोठेपणा । लाधला श्रीहरीसी ।। ९३ ॥ ज्याचें वर्णन वेदासी । न होय ऐशा ब्रम्हासीं ॥ सगुण करवून भूमीसी । नाचविलें संतांनीच ॥ ९४ ॥ दामाजीनें बनविला महार । वैकुंठपती रुक्मीणीवर || चोखोबाने उचलण्या ढोरें । रावविलें त्या जगदात्मया ।। ९५ ।
स्फुट विषय.
संतगहात्व जाणून । पाणी वाहीं जगज्जीवन ||
संत खरेंच यजमान । सच्चिदानंद प्रभूचें ॥ ९६ ॥ फार बोलणें नलगें आतां । तूंच आम्हां माता पिता ॥ हे सद्गुरु साइनाथा । शिर्टि ग्रामनिवासिया ॥ ९७ ॥ बाबा तुमच्या लीलेचा । कोणा न लागे पाउसाचा ॥ तेथें माझी आर्षवाचा । टिकेल सांगा कोठून ॥ ९८ ॥ अड जीवांच्या उद्धारार्थ । आपण आळांत शिडींत ॥
पाणी ओतून पणत्यांत । दिवे तुम्हीं जाळिलें ॥ ९९ ॥ सवाहात लाकडाची फळी मंचक करून साची ॥
|
1
आपुल्या योगसामर्थ्याची । शक्ति दाविली भक्तजना ॥ १०० ॥ वांझपणा कैकांचा । तुम्ही केलांत हरण साचा ॥
कित्येकांच्या रोर्गांचा। वीं मोड केलांत उदीनें ॥ १०१ ॥ वारण्या ऐहिक संकटे । तुम्हां न कांही अशक्य वाटे ॥ पिपीलिकेचें कोठून मोठें । ओझें मानी जगपती ॥ १०२ ॥ असो आतां गुरुराया । दीनावरी करा दया ||
1
३५
मी तुमच्या लागलों पाया। मार्गे न कोटा मजलागी ॥ १०३ ॥ तुम्ही महाराज राजेश्वर । तुम्हीं कुबेराचे कुबेर ||
॥
तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार । तुम्हांविण ना श्रेष्ठ कोणी ॥ १०४ ॥ अवांतराचे पूजेस । साहित्य आहे विशेष ।।
• परी पूजाया तुम्हांस । जगीं न पदार्थ राहिला ॥ १०५ ॥ पहा सूर्याचिया घरीं । सण दिपवाळी आली खरी ॥
1
परि ती त्यानें साजिरी करावी कोणत्या द्रव्यं ॥ १०६ ॥ सागराची शमवावया । तहान जल ना महीठाया ||
वन्हीलाग शेकावया । अग्नी कोठून यात्रा तरी ॥ १०७ ॥
३६
श्रीसाई लीला.
जे जे पदार्थ पूजेचे । ते ते तुमच्या आत्म्याचे ॥ अंश आधींच असती साचे । श्रीसमर्था गुरुराया ॥ १०८ ॥ हें तत्व दृष्टीचं बोलणें । परी न तैशी झालीं मनें ॥
बोललों अनुभवाविणें । शब्दजाल निरर्थक ।। १०९ ।।
व्यवहारीक पूजन जरी तुमचें करूं मी सांग तरी ॥
।
तें कराया नाहीं पदरीं । सामर्थ्य माझ्या गुहराया ॥ ११५ ॥ बहुतेक करून कल्पना । तुमच्या करतों पूजना ||
तेंच पूजन दयाघना | मान्य करा या दासाचें ॥ १११ ॥ आतां प्रेमाश्रु करून । तुमचें प्रक्षालितों चरण । सद्भक्तीचं चंदन उगाळून लावतों ॥ ११२ ॥ कफनी शब्दालंकाराची । घालितों ही तुम्हां साची ॥ प्रेमभाव या सुमनांची माळा गळयांत घालितों ॥ ११३ ॥ धूप कुत्सितपणाचा । तुम्हांपुढें जाछितों साचा ।
जरी तो वाईट द्रव्याचा । परी ना सुटेल घाण त्यासीं ॥ ११४ ॥ सद्गुरुविण इतरत्र । जे जे धूप जाळितात ।।
।
त्या धूप द्रव्याचा तेथ । ऐसा प्रकार होतसे ॥ ११५ ॥ धूप द्रव्यास अग्नीचा स्पर्श होताक्षणीं साचा ॥
सुवास सद्गुण तदंगीचा । जात त्याला सोडूनि ॥ ११६ ॥ तुमच्या पुढें उलटें होतें । घाण तेवढी अग्नींत जळतें ॥ सद्गुण उरती पाहण्यातें | अक्षयीचे जगास ॥ ११७ ॥ मनींचें जळाल्या कुत्सितपण । मलरहित होईल मन || गंगेचें गेल्या गढूळपण | मग ती पवित्र सहजची ।। ११८ ।। दीप माया मोहाचा । पाजळितों मी हा साचा ।।
तेणें वैराग्य प्रभेचा होवो गुरुवरा लाभ मशीं ।। ११९ ।।
स्फुट विषय.
शुद्ध निष्ठेचं सिंहासन । देतों घसाया कारण ॥
त्याचें करूनियां ग्रहण | भक्तिनैवेद्य स्वीकारा ॥ १२० ॥ भक्तीनेंवेद्य तुम्हीं खाणें । तस मला पाजणें ॥
कांकों मी तुमचें तान्हें । पयावरी हक्क माझा ॥ १२१ ॥ मन माझें दक्षणा । ती मी अर्पितों आपणां ॥
जेणें नुरेल कर्तेपणा । कशाचाही मजकडे ॥
१२२ ॥
आतां प्रार्थना पूर्वक मात्र । घालितों मी दंडवत ।।
तँ मान्य होवो आपणांप्रत । पुण्य श्लोका साईनाथा ॥ १२३ ॥
॥ प्रार्थनाष्टक ||
॥ श्लोक ॥
शांत चित्ता महामज्ञा साइनाया दयाघना ॥
दया सिंधो सत्स्वरूपा । माया तम विनाशना ॥ १ ॥ १२४ ॥ जात गोतातिता सिद्धा । अचिंत्या करुणालया ॥
पाहि मां पाहि मां नाथा । शिडींग्राम निवासिया ।। २ ।। १२५ ।। श्री ज्ञानार्का ज्ञान दात्या । सर्व मंगलकारका ॥
भक्त चित्त मराळा हे । शरणागत रक्षका ॥ ३ ॥ १२६ ॥
सृष्टिकर्ता विरिंची तूं । पाता तूं इंदिरापती ॥
1
जगत्रया लया नेता । रूद्र तो तूंच निश्चिती ॥ ४ ॥ १२७ ॥ तुजवीणें रिता कोठें । ठाव नाया महीवरी ।।
1
सर्वज्ञ तूं साईनाथा । सर्वोच्य हृदयांतरीं ॥ ५ ॥ १२८ ॥ क्षमा सर्वापराधाची करावी हेंच मागणं ॥
अभक्ती संशयाच्या त्या । काटा शीघ्र निवारणं ।। ६ ।। १२९ ॥ तूं धेनू वत्स मी तान्हें । तूं इंदू चक्रवाक मी ॥
स्वर्नदी रूपत्वत्पादा | आदरें दास हा नमी ॥ ७ ॥ १३० ॥
३७
३८
श्रीसाई लीला.
ठेव आतां शिरीं माझ्या कृपेचा करपंजर |
शोक चिंता निवारावी । गणू हा तब किंकर ।। ८ ।। १३१ ॥ या प्रार्थनाष्टके करून । मी करीतों साष्टांग नमन ॥
पापताप आणि दैन्य । माझें निवारा लवलाहीं ॥ १३२ ॥ तूं गाय मी वासरूं । तूं माय मी लेकरूं ||
माझे विषयीं नको धरूं । कठोरता मानसीं ॥ १३३ ॥
मैकागिरी चंदन मी फांटेरी झुडुप जाण ॥
पवित्र गोदा जीवन । मी महापातकीं ॥ १३४ ॥
1
तुझें दर्शन होवोनिया । दुर्ब ुद्धी घाण माझे ठाया ||
राहिल्या तैशीच गुरुराया । चंदन तुजला कोण म्हणं ॥ १३५ ॥ कस्तुरीच्या सहवासें । मृत्तिका मोल पावतसे ॥
पुष्पासंगें घटतसे । वास मस्तकीं गुरुराया ॥ १३६ ॥ थोराची ती हीच रीती । ते ज्या ज्या गोष्टी ग्रहण करिती ॥
त्या त्या वस्तूना पाववती । ते महत्पदाकारणें ॥ १३७ ॥ भस्म कौपीन नंदीचा । शिवें केला संग्रह साचा ॥
म्हणून त्या वस्तूंचा । गौरव होत चहूंकडे ॥ १३८ ॥ गोपरंजनासाठीं । वृंदावनीं यमुना तटीं ॥
mum
काला खेळला जगजेठीं । तोही मान्य झाला बुधां १३९ ॥ तैसा मी तो दुराचारी । परी आहे तुमच्या पदरीं ॥ म्हणून विचार अंतरीं । याचा कराहो गुरुराया ॥ १४० ॥ ऐहिक वा परमार्थिक | व्या ज्या वस्तूंस मानील सुख।। माझें मन हे निःशंक । त्या त्या तुम्ही पुरविणें ॥ १४१ ॥ आपुल्या कृपेनें ऐसें करा | मनालागीं आंवरा ॥
गोड केल्या सागरा | क्षारोदगमनाची नसे भिती ।। १४२ ।।
स्फुट चिपथ.
सागरा गोड करण्याची । शक्ति आपणामध्यें साची ॥ म्हणून दास गणूची | याचना हीं पुरी करा ॥ १४३ ॥ कमीपणा जो जो माझा । तो तो अवघा तुझा ||
सिद्धांचा तूं आहेस राजा । कमीपणा न वरवा तुजशीं ॥ १४४ ॥ आतां कशास्तव बोलूं फार । तूंच माझा आधार ||
शिशु मातेच्या कडेवर । असल्या निर्भय सहजची || १४५ ॥ असो या स्तोत्रासीं । जे जे वाचतील मेमेसी ॥
त्यांच्या त्यांच्या कामनेसी । तुम्हीं पुरखा महाराजा ॥ १४६ ॥
हाच असो निरंतर ||
या स्तोत्रास आपुला वर
पटणकर्त्याचं त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरीं ||१४७ ॥ शुचिर्भूत होऊन । नित्य स्तोत्र करावे पठण |
॥
शुद्धभाव ठेवून । आपुलिया मानसीं ॥ १४८ ॥ हैं अशक्य असलें जरी । तरी प्रत्येक गुरुवारी | सद्गुरु मूर्ति अंतरीं । आणून पाठ करावा ।। १४९ । तेंही अशक्य असल्यास । प्रत्येक एकादशीस ॥
वांचणे या स्तोत्रास । कौतुक त्याचे पहावया ॥ १५० ॥ स्तोत्र पाठकां उत्तम गती । अंती देईल गुरुमूर्ति ॥
1
ऐहिक वासना सत्वर गती । त्याची पुरवून श्रोते हो ॥ १५१ ॥ या स्तोत्राच्या पारायणें । मंद बुद्धि होतील शहाणे ||
कोणा आयुष्य असल्या उणे । तो पठणें होय शतायु ॥ १५२ ॥ धनहीनता असल्या पदरीं । कुबेर येऊन राबेल घरीं ॥ हे स्तोत्र वाचल्यावरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥ १५३ ॥ संतति हीना संतान । होईल स्तोत्र केल्या पठण ॥ स्तोत्र पठकाचें संपूर्ण । रोग जातील दिगंतरा ।। १५४ ॥
४०
श्रीसाई लीला.
भय चिंता निमेल । मान मान्यता वाढेल |
अविनाश ग्रम्ह कळेल । नित्य स्तोत्राच्या पारायणें ।। १५५ ।। धरा बुध हो स्तोत्राविशीं । विश्वास आपुल्या मानसीं ॥ तर्क वितर्क कुकल्पनेशीं । जागा मुळीं देऊं नका ॥ १५६ ॥ शिर्डी क्षेत्राची वारी करा । पाय बाबांचे चितीं धरा |
जो अनाथांचा सोयरा । भक्तकामकल्पद्रुम । १५७ ॥ त्याच्या प्रेरणे करून । हें स्तोत्र केलें लेखन ॥
मज पामरा हातून । ऐसी रचना होय फँसी ।। १६८ ।। शके अठराशें चाळीसांत । भाद्रपद शुद्ध पक्षांत ॥
तिथी गणेश चतुर्थी सत्य । सोमवारों द्वितीय प्रहरीं ॥। १५९ ।। श्री साईनाथ स्तवन मंजिरी पूर्ण झाली महेश्वरीं
पुनित नर्मदेच्या तिरीं। श्री अहिल्ये सन्निध ।। १६० ।। महेश्वर क्षेत्र भलें । स्तोत्र तेथे पूर्ण झालें ॥
प्रत्येक शब्दासीं वदविलें । श्री साईनाचे शिरुन मनों ।। १६१ ।। लेखक शिष्य दामोदर । यात्र झाला साचार
दास गणू मी किंकर । अवध्या संत महंताचा ॥ १६२ ॥ स्वस्ति श्री साईनाथ स्तवन मंजिरी । तारक होवो भव सागरों ।। हेच विनवी अत्यादरीं । दास गणु श्री पांडुरंगा ॥ १६३ ॥
।
श्री हरिहरार्पणमस्तु । शुभं भवतु । पुंडलीकवरदहरी विठ्ठल ॥
सीताकांतस्मरण जय जय राम । पार्वतीपते हर हर महादेव || सद्गुरु साईनाथ महाराजकी जय ।
॥ श्री सद्गुरु साईनाथार्पण मस्तु शुभं भवतु ॥ ॥
ঊ
॥
अध्याय ६ वा.
श्रीगणेशायनमः | श्रीसरस्वत्यैनमः | श्रीगुरुभ्योनमः ॥ श्री कुलदेवता नमः | श्रीसीतारामचंद्राभ्यांनमः । श्रीसद्गुरु साईनाथायनमः ॥
असो परमार्थ वा संसारू । जेथें सद्गुरु कर्णधारू ||
।
॥
तेंचि तारूं पैलपारू । नेऊन 'उतारू लावील ॥ १ ॥
सद्गुरू शब्द वृत्ती उठवां । साईच प्रथम आठवती चित्ता || उभेच ठाकती सन्मुखता | ठेविती माथा निजहस्त ॥ २ ॥ धुनीमाजील उदी समन्वित । पडे जंब मस्तकीं वरदहस्त || हृदय स्वानंदें उलून येत । प्रेम ओसंडत नेत्रांतुनी ॥ ३ ॥
।
211
नवल गुरुहस्त स्पर्श विंदान । प्रलयाग्नींतही न होई जो दहन || त्या सूक्ष्म देहाचें करी ज्वलन । भस्मीभवन करस्पर्श ॥ ४ ॥ चुकूनि देवाची कथा वार्ता | निघाल्या उठे तिडीक मोथा ॥ वाचा प्रवाहे बाष्कळता । तयाही स्थीरता लाभावी ॥ ५ ॥ शिरीं ठेवितां करकमल । अनेका जन्मींचे परिपक्क मल ॥ जाती धुवूनि होती निर्मल । भक्त प्रेमळ साईचे ॥ ६॥ रूप पाहातां तें गोमटें । परमानंदें कंठ दाटे ॥
नयनीं आनंदा पाझरे फुटे । हृदयों मगढे अष्टभाव ।। ७ ।।
११०
श्रीसाई लीला.
सोहंभावास जागवीत । निजानंदास प्रकटवीत ॥ ठायींच मीतूं पणा विरवीत । समरसत मिरवीत अद्वैत ॥ ८ ॥
बाबूं जातां पोयीपुराण । पावलो पावलीं सद्गुरू स्मरण ॥ साईच नटे रामकृष्ण । करवी श्रवण निजचरित्र ॥ ९ ॥ परिसूं बसतों भागवत । कृष्णचि साई नखशिखांत ॥ वाटे गाई तें उद्धव गीत | भक्त निजहित साधाया ॥ १० ॥ सहज बसावें करूं वार्ता । तेथेंही साईनाथांची कथा ॥ अकल्पितचि आठवे चित्ता । योग्य दृष्टांता द्यावया ॥ ११ ॥
कागद घेऊनि लिहूं म्हणतां । अक्षरीं अक्षर येई न जुळवितां ॥ परी तोचि जेव्हां लिहिवी स्वसत्ता । लिहितां लिहिता लिहिवेना ॥ १२ जंव जंब अहंभाव डोकावत । निजकरें तथा तळीं दडपित || वरी करोनि निज शक्तिपात । शिष्यास कृतार्थ करीत ते ॥ १३ ॥ काया वाचा मनें येतां । लोटांगणीं साई समर्था |
धर्मार्थ काम मोक्ष हाता । चढती न मागतां आपसे ॥ १४ ॥
कर्म ज्ञान योग भक्ती | या चौमागी ईश्वर माप्ती |
जरी हीं चार चौबाजूं निघती । तरीही पोंचविती निजठाया ||१५|| भक्ती ही बाभुळवनींची वाट । खांचा खळगे अती विकट || एक पावलीं परी ती नीट । हरी निकट नेईकीं ॥ १६ ॥ कांटा टाळूनि टांका पाय । हाचि एक सुलभ उपाय | तरीच निजधाम पावाल निर्भय । निक्षूनि गुरुमाय वदं हें ॥ १७ ॥ मनाचे मळे जैं भक्तों शिपिले । वैराग्य खुले ज्ञान फुले ||
कैवल्य फळे चित्सुख उफले । अचूक चुकलें जन्ममरण ॥ १८ ॥
श्रीसाईसच्चरित अध्याय ६ वा.
१११
मूळ परमात्मा स्वयंसिद्ध । तोचि सच्चिदानंद त्रिविध ॥ उपाधी योगें झाला प्रबुद्ध । प्रगट बोध भक्तार्थ ॥ १९ ॥ जैसा तो या त्रैगुण्यें व्यक्त । मायाही होऊन क्रिया प्रयुक्त ॥ सत्व रज-तमा चाळवीत । करी सुव्यक्त निजगुण ॥ २० ॥ मृत्तिकेचा विशिष्ट आकार । तया नाम घट साचार ॥ घट फुटतां नाम रूप विकार निघूनि पार जातात ॥ २१ ॥ हें अखिल जग माये पासाव । परस्परां कार्य कारण भाव ॥ मायाचि प्रत्यक्ष सावयव । होऊनि उद्भवली जगरूपें ॥ २२ ॥ जगा आर्थी मायेची स्थिती पाहूं जातां नाहीं व्यक्ती ॥ परमात्मरुपीं लीन होती । परम अव्यक्तीं संचली ॥ २३ ॥ व्यक्त होतांही परमात्मरूप । अव्यक्त तरीं ही परमात्मरूप || एवंच ही माया परमात्मरूप | अभेदरूप परमात्मीं ॥ २४ ॥ मायेनें तमोगुणापासून । केले जडपदार्थ निर्माण || निर्जीव चलन वलन शून्य । क्रिया पूर्ण ही प्रथम ॥ २५ ॥ मग मायेच्या रजोगुणीं । परमात्मचित्गुणाची मिळणी | होतां उघडली चैतन्य खाणी । स्वभावगुणीं उभयांचे || २६ ॥ पुढे या मायेचा सत्वगुण । करी बुद्धि तत्व निर्माण || तेथ परमात्म्याचा आनंदगुण | मिसळतां सेळा संपूर्णता ॥ २७ ॥ एवं माया महा विकारी । क्रियोपाधि जों न स्वीकारी | पूर्वोक्त पदार्थात न करी । त्रिगुण तोंवरी अव्यक्त ॥ २८ ॥
गुणानुरूप क्रिया कांहीं । न करितां माया व्यक्त नाहीं ॥ राहू शके अव्यक्त पाहीं । स्वयं जैं सेवी अक्रियत्व || २९ ।।
११२
श्रीसाई लीला.
माया कार्य परमात्म्याचें । जग हैं कार्य त्या मायेचें ॥ सर्वं खल्विदं ब्रह्मत्वाचें । ऐक्य तिहींचें तें हेंची ॥ ३० ॥
ऐसी जे हे अभेद प्रतीति । कैसेनि प्राप्तहोय निश्चिती ।। ऐसी उत्कटेच्छा जया चित्तीं । वेद श्रुति पहावी ॥ ३१ ॥ सारासार विचार शक्ति । वेदशास्त्र श्रुति स्मृती || गुरू वेदांत वाक्य प्रतीति । परमानंद प्राप्ती दे ॥ ३२ ॥ "माझिया भक्तांचे धामीं । अन्नावस्त्रास नाहीं कमी" || ये अथ श्री साई दे हमी । भक्तांसि नेहमीं अदगत ॥ ३३ ॥ मज भजती जे अनन्यपणें । सेविती नित्याभियुक्तमनें ॥ तयांचा योगक्षेम चालविणें । ब्रीद हें जाणें मी माझें ॥ ३४ ॥ हेच भगवद्गीता वचन | साई म्हणती माना प्रमाण ॥ नाहीं अन्नावस्त्राची वाण । तदर्थ माण बेचूं नकां ॥ ३५ ॥ देवद्वारीं मान व्हावा । देवापुढेंच पदर पसरावा ॥ तयाचाच प्रसाद जोडावा । मान सोडावा लौकिकी ॥ ३६ ॥ काय लोकीं मान डोलविली । तितुक्यानेका भरसी भुली || आराध्य मूर्ति चित्तीं द्रवली । धर्मे डवडवली पाहिजे ॥ ३७ ॥ हेंच ध्येय लागो गोड । सर्वेन्द्रियीं भक्तीचं वेड ॥ इंद्रिय विकारां भक्तीचे मोड । फुटोत कोड मग काय ॥ ३८ ॥ सदैव ऐसें भजन घडो | इतर कांहींही नावढी ||
मन मन्नाम स्मरणी जडो । विसर पडो अवध्याचा ।। ३९ ।। नाहीं मग देह-गेह वित्त । परमानंदीं जडेल चित्त ॥
मन समदर्शी आणि प्रशांत । परिपूर्ण निश्चित होईल ॥ ४० ॥
श्रीसाईसच्चरित अध्याय ६ वा.
सत्संग केलीयाची खूण । वृत्तीस पाहिजे समाधान ॥
|
११३
नानाठायीं बसे जें मन । तें काय सल्लीन म्हणावें ॥ ४१ ॥ तरी होऊनि दत्तावधान । श्रोतां भावार्थी परिसिजे निरूपण ।। करितां हें साईचरित्र श्रवण । भक्तिप्रवण मन होवो ॥ ४२ ॥ कथा संगती होईल तृप्ती । लाल चंचलमना विश्रांती ॥ होईल तळमळीची निवृत्ती । सुख संवित्ती पावाल ॥ ४३ ॥ आतां पूर्वील कथानुसंधान । मशीदीचें जीर्णोद्धरण || रामजन्माचें कथा कीर्तन । चालवूं निरूपण पुढारां ॥ ४४ ॥ भक्त एक गोपाळ गुंड । जयास बाबांची भक्ति उदंड ॥ मुखीं बाबांचे नाव अखंड | काळ कंठण ये रीती ॥ ४५ ॥ तयास नव्हतें संतान । पुढें साई प्रसादें करून || पावता झाला पुत्र रत्न । चित्त प्रसन्न जाहलें ॥ ४६ ॥ झाले गोपाळ गुंडाचे मानस । यात्रा एक अथवा उरूस || भरवावा शिर्डीग्राम वर्षा होईल उल्हास सर्वत्रां ॥ ४७ ॥ तात्या कोते, दादा कोते । माधवरावादि प्रमुख जनातें ॥ रुचला विचार हा सकळांतें । तयारीतें लागले ॥ ४८ ॥ परी या वार्षिक उत्सवा लागून । आधीं एक नियम निबंधन || जिल्हाधिकारी यांचें अनुमोदन । करणं संपादन आवश्यक ॥४९॥ तदर्थ उद्योग करूं जातां । गांवी जो एक कुळकर्णी होता || कुत्सितपणें उलटा जातां । आला मोडता कार्यात ॥ ५० ॥
१ हे मोजणी खात्यांत सर्व्हेअर असून यांचेवर साईबाबांची फार
कृपा असे.
११४
श्रीसाई लीला.
कुळकणीं जो आडवा पडला | पहा कैसा परिणाम आला ॥ यात्रा भरूं नये शिर्डीला । हूकूम झाला जिल्ह्याचा ॥ ५१ ॥ परी ही यात्रा भरावी शिर्डीत | बाबाचेंही हेंच मनोगत || आशापूर्ण आशिर्वाद युक्त । होती तदर्थ झालेली ॥ ५२ ॥ ग्रामस्थांनीं पिच्छा पुरविला । जिवापाड यत्न केला ॥ अधिकारियांनीं हुकूम फिरविला । मान राखिला सकळांचा ॥५३॥ तेव्हांपासून बाबांच्या मतें । यात्रा ठरविली रामनवमीतें ॥ व्यवस्था पाहती तोत्या कोते । यात्रा येते अपरंपार ॥ ५४ ॥ त्याच रामनवमीचे दिसीं । भजन पूजन समारंभेसी ॥ तासे चौघडे वाजंत्रेसी । यात्रा चौपासी गडगंज ॥ ५५ ॥ वर्षास दोन नवीं निशाण समारंभ होई मिरवणें ॥ मशीदीचे कळसास बांधणें । तेथेंच रोवणें अखेर ॥ ५६ ॥ त्यांतील एक निमोणेकरांचें । दुर्जे निशाण दोमू अण्णांचें ॥ मिरवणें होतें थाटामाटाचें । फडकतें कळसाचे अग्रभागी ॥ ५७ ॥ पुढें रामनवमीचा उत्सव | उरुसा पोटीं कैसा समुद्भव | परिसा ते कथानक अभिनव । स्वानंद गौरव शिर्डीचें ॥ ५८ ॥ शके अठराशें तेहतीस सालीं । रामनवमी प्रथम झाली ॥ उरुसापोटी जन्मास आली । तेथून चालली अव्याहत ॥ ५९ ॥
। प्रसिद्ध कृष्ण जागेश्वर भीष्म । तेथून या कल्पनेचा उगम ।। करावा रामजन्मोपक्रम । लाल परम कल्याण ॥ ६० ॥
१ यांचे पूर्ण नांव शंकरराव रघुनाथ देशपांडे उर्फ नाना साहेब निमोणकर.
२ अहमदनगरचे एक बाबांचे फार जने कामार जातीचे भक्त आहेत.
श्रीसाईसच्चरित अध्याय ६ वा.
तेथ पर्यंत केवळ उरूस । यात्रा भरत असे बहुवस ।।
११५
त्यांतून हा जन्मोत्सव सुरस | आला उदयास ते सालीं ॥ ६१ ॥ एकदां भीष्म स्वस्थचित्त । वाडियामाजी असतां स्थित ॥ कीका पूजासंभार समवेत । जावया मशीदींत उद्युक्त ॥ ६२ ॥ अंतरीं साईदर्शन काज । वरी उरुसाची ही मौज ॥
काका आधींच एक रोज । शिर्डीत हाजर उत्सवार्य ॥ ६३ ॥ पाहूनिया समय उचित । भीष्म तेव्हां काकांस पुसत ॥ सद्वृत्ती एक मनीं स्फुरत । द्याल का मदत मज लागीं ॥ ६४ ॥ येथें वर्षास भरतो उरूस । रामजन्माचा हा दिवस ॥
तरी जन्मोत्सव संपादायास । आहे अनायास ही संधी ॥ ६५ ॥ काकांस आवडला तो विचार । घ्या म्हणाले बाबांचा होकार ॥ आहे तयांच्या आज्ञेवर । कार्यास उशीर नाहीं मग ॥ ६६ ॥ परि उत्सवा लागे कीर्तन । उभा राहिला तोही प्रश्न ॥ खेडेगांवी हरदास कोठून । ही एक अडचण राहिली ॥ ६७ ॥ भीम म्हणती मी कीर्तनकार | तुम्ही घरा पेटीचा स्वर ॥ राधाकृष्णाबाई तयार । सुंठवडा वेळेवर करितील ॥ ६८ ॥ चला की मग बाबांकडे । विलंब हें शुभकार्या सांकडें ॥ शुभासि जें शीघ्रत्व जोडे । साधे रोकडें तें कार्य ॥ ६९ ॥ चला आपण पुसावयास । आज्ञा कीर्तन करावयास । ऐसें म्हणतांच मशीदीस । दोघे ते समयास पातले ॥ ७० ॥ काका आरंभ करितां पूजेतें । बाबाच जाहले मश्न पुसते ।। काय वाड्यांत चाललें होतें । सुचेनातें काकांना ॥ ७१ ॥
१ लक्ष्मण गणेश उर्फ काका महाजनी.
११६
श्रीसाई लीला.
तात्काळ बाबा भीष्मावती । तोच प्रश्न अन्यरीती ॥
1
को बुबा काय म्हणती म्हणवूनि पुसती तयांतें ॥ ७२ ॥ तेव्हां काकांस आठव झाला । उद्दिष्टार्थ निवेदियेला ||
विचार बाबांचे मनास रुचला । निश्चित केला उत्सव || ७३ ॥ दुसरे दिवशीं प्रातःसमयाला । पाहूनि बाबा गेले लेंडीला ॥ सभा मंडपों पार्कणा बांधिला | थाट केला कीर्तनाचा ॥ ७४ ॥ पुढं वेळेवर श्रोते जमले । बाबा परतले भीष्म उटले || काका पेटीवर येऊन बैसले । बोलावूं पाठविलें तयांनां ॥ ७५ ॥ "बाबा बोलाविती तुम्हास ऐकतां काकांचे पोटीं धस्स ॥ काय आलें न कळे मनास । कथेचा विरस ना होवो ॥ ७६ ॥ ऐकूनि बाबांचं निमंत्रण । काकांची तेथेंच झाली गाळण ॥ बाबा कां बरें क्षुब्ध मन । निर्विघ्न कीर्तन होईल ना ॥ ७७ ॥ पुढे चालती मार्गे पहाती । भीत भीत पायच्या चढ़ती ॥ मंदमंद पाउलें पडती । चिंतावनी बहु काका ।। ७८ ।।
बाबा तयांस करिती विचारणा । कशास येथे बांधिला पाळणा ।। कथा तात्पर्य आणि योजना । ऐकून मना आनंदले ।। ७९ ।। मग तेथें जवळ निंवर । घेऊन तेथून एक हार ||
घातला काकांच्या कंठीं सुंदर । भीष्माकरितां दिला दुजा ॥ ८० ॥
पाळण्याचा प्रश्न परिसतां । उपजली होती मोठी चिंता || परी गळां तो हार पडतां । सर्वास निश्चितता जाहली ॥ ८१ ॥ आधींच भीष्म बहुश्रुत । विविध कथा पारंगत ॥
कीर्तन जाहलं रसभरित । आनंद अपरिमीत श्रोतयां ॥ ८२ ॥
श्रीसाईसच्चरित अध्याय ६ वा.
।
बाबाही तें प्रसन्न वदन । जैसें दिधलें अनुमोदन |
११७
तैसाच उत्सव घेतला करवून । कीर्तन भजन समवेत ॥ ८३ ॥ रामजन्माचिया अवसरीं । गुलाल वावांच्या नेत्राभीतरी ॥ जाऊनि प्रकटले बाबा नरहरी । कौसल्ये मंदिरीं श्रीराम ॥८४॥ गुलालाचे केवळ मीष । रामजन्माचा तो आवेश | होईल अहं रावणाचा नाश । दुर्वृती राक्षस मरतील ॥ ८५ ॥ एकाएकीं आला कोप । प्रत्यक्ष नरसिंव्हाचें रूप ॥
सुरू झाले शिव्याशाप । वर्षाव अमूप जाहला ।। ८६ ।। पाळण्याचे होतील तुकडे । राधाकृष्णा मनीं गडबडे || राहील कैसा धड हें सांकडें । येऊन पडे तिजलागीं ॥ ८७ ॥ सोडा सोडा लवकर सोडा । पाठीस लागतां तिचा लकडा ॥ काका तेव्हां सरकले पुढा । पाळणा सोडावयातें ॥ ८८ ॥ तंत्र तो बाबा अती कावले । काकाचिया अंगावर धांवले ॥ पाळणा सोडणें जागींच राहिलें। वृत्तीवर आले बाबाही ॥ ८९ ॥ पुढे दुपारीं आज्ञा पुसतां । बाबा काय बदले आश्रर्यता ॥ एव्हांच कैचा पाळणा सोडतां । आहे आवश्यकता अजून ॥ ९० ॥ ही आवश्यकता तरी कसली । अन्यथा नव्हे साई वचनावली ॥ विचार करितां बुद्धि स्फुरली । सांगता झाली न उत्सवाची ॥९१॥ येथवरीं जरी उत्सव झाला । दुसरा दिन जों नाहीं उगवला ॥ नाहीं झाला जो गोपाळकाला । उत्सव सरला न म्हणावें ॥ ९२ ॥ एणे प्रमाणे दुसरे दिनीं । गोपालकाला कीर्तन होऊनी ।। पाळणा मग सोढाया लागुनी । आज्ञा बांबांनी दीधली ॥ ९३ ॥ १हा रामजन्मास लागणारा पाळणा या बाईनी पुरविला होता. २ संपूर्णता
११८
श्रीसाई लीला.
पुढील वर्षी भीष्म नव्हते । बाळाबुबा सातारकरांतें ॥
कीर्तनार्थ आणविणें होतें । जाणें कवचातें तयांना ॥ ९४ ॥ म्हणून बाळोबुबा भजनी । प्रसिद्ध अर्वाचीन तुका म्हणुनी ॥ घेउनि आले काका महाजनी । उत्सव त्या हातूनि करविला ॥९५ हेही जरी मिळाले नसते । काकाच कीर्तनार्थ उभे रहाते || दासगणूकृत अख्यान त्यांतें । पाठचि होतें नवमीचें ॥ ९६ ॥ तिसरे वर्षी सातारकर | बाळाबुवांचंच शिर्डीवर ।। आगमन जाहलें वेळेवर । कैसें सादर परिसा तें ॥ ९७ ।। ऐकूनि साईबाबांची कीतीं । दर्शन काम उद्भवला चित्तीं ॥ परी मार्गीत पाहिजे संगती । लाभेल केउती ही इच्छा ॥ ९८ ॥
बाळाबुवा स्वयें हरदास । सातान्याकडे मूळ रहिवास ||
।
मुंबापुरीं परेळास । होता निवास ये समयीं ॥ ९९ ॥ बिन्हाड सिद्ध कवठे म्हणून सातारा जिल्ह्यांत देवस्थान ॥ तेथें रामनवमीचें कीर्तन । वर्षासन बुवांस ॥ १०० ॥ आशाढीची एकादशी । रामनवमी चैत्र मासीं ॥
या दोन वार्षिक उत्सवांसी | वाळाबुवासी संबंध ॥ १०१ ॥ बादशाही सनद पाहतां । वढे बाबांचे खर्चा करितां ॥ रुपये चतुर्विंशति शतां । मूळ व्यवस्था संस्थानीं ॥ १०२ ॥
* " बिन्हाड सिद्धकवठे " म्हणून सातारा जिल्ह्यांत एक गांव आहे. तेथील रामनवमीच्या उत्सवाचे या बुवांस वर्षासन आहे.
१ ही सनद अकबर बादशहापासूनची आहे व तो खर्च शिवरा त्रीचे उत्सवाचा खर्च वगैरेसह या देवस्थानाचे इतर सर्व खर्च सांप्रत सांगली संस्थानामार्फत चालतात असे समजते. सारांश हैं देवस्थान फार जुने व सांगली संस्थानच्या आधीचे आहे
श्रीसाईसच्चरित अध्याय ६ वा.
११९
असो या दोन उत्सवालागीं । रुपये त्रिंशत बुबांची बिदागी ॥ परी ते वर्षों कवठयास मरगी । पडले प्रसंगीं ग्रामस्थ ॥ १०३ ॥ तेणें रामनवमी राहिली । बुबांस तेथून पत्रे आलीं ॥
यावें आतां पुढील सालीं । ग्रामची खाली झालासे ॥ १०४ ॥ सारांष रामाची सेवा चुकली । बिदागी ही जागीं राहिली ॥ शिर्डीस जावया संघी फावली । भेट घेतली दीक्षीतांची ॥ १०५ ॥ दीक्षीत बाबांचे परमभक्त । शिरडी गमनाचा मनोगत || पुरेल त्यांनीं आणितां मनांत । स्वार्थ परमार्थ साधेल ॥ १०६ ॥ बदती तैं ते दीक्षीतांलागून | यंदा राहिलें वर्षासन || घ्यावें वाटे बाबांचे दर्शन । तेथेंच कीर्तन करावें ॥ १०७ ॥
भाऊसाहेब तेव्हां बढ़ती । बिदागीची नाहीं निश्चिती ॥
।
देणें न देणें वाचांचे हातीं । लागेल संमती कीर्तनाही ॥ १०८ ॥ इतुकें संभाषण चाललें असतां । काका महाजनी येऊनि अवचिता ।। शिर्डीप्रसाद उदी वाटितां । शुभशकुनता गमली ते ॥ १०९ ॥ तेच वेळीं महाजनी । आले होते शिरडीहुनी ||
क्षेम कुशल वृत्त कळवूनि । मग निज सदनीं परतले. ।। ११० ।। असो पुढे बुवामतीं । दीक्षीत तेंव्हां परम प्रीती ॥
म्हणती विचारीन बाबांची संमती दिल्या निश्चिती कळवीन ॥ १११ ॥ पत्र येतां शिरडीस यावें । वाटखचींलागी न भ्यायें || तदर्थ नलगे आपणां झिजावें । निःशंक असावें मनास ॥ ११२ ॥ असो पुढे दीक्षीत गेले । बाबांनों अनुमोदनही दिधलें || वाळावा शिर्डीस आले । दर्शन घडलें यथेष्ट ॥ ११३ ॥
२ हरी सिताराम उर्फ काकासाहेव दीक्षित.
१२०
श्रीसाई डीला.
साईबाबांहीं सन्मुख सगळा | रामनवमीचा उत्सव सोहळा ॥ बाळाबुबांच्या हस्ते घेतला । करबूनि नबलाब प्रेमानें ॥ ११४ ॥ बाळाबुवाही मनीं तुष्टले । चितिलें कार्य पार पडलें ॥ साईही प्रसन्न चित्त जाहले । मनोरथ पुरले सर्वाचे ॥ ११५ ॥ संभावनाही यथास्थित । शतोपरी पंचाशत |
रुपये घ्यावया आज्ञा होत । आनंद अपरिमीत बुवांस ॥ ११६ ॥ पंचवार्षिक कवठ्याची प्राप्ती | एकाच उत्सवीं बाबा देती ॥ बाळाबुवा कां न आनंदती । आभारी होती बाबांचे ॥ ११७ ॥ असो पुढे एके दिवशीं । दासगणू येतां शिडींसी ॥
देवविला प्राधूनि बाबांसीं । उत्सव प्रतिवर्षी तयांस ॥ ११८ ॥ तेथूनि पुढे हा कालबरी । होताहे जन्मो सब गडगजरीं ॥ अन्न संतर्पण आकंठवरी । महारा पोरीं आनंद ॥ ११९ ॥
समाधीच्या महाद्वारीं | मंगल वाद्यांचिया गजरीं || साई- नाम - घोप अंबरीं । आनंद निर्भरीं कोंदाटे ॥ १२० ॥ जैसी यात्रा वा उरुस । तसेंच स्फुरले गोपाळ गुंडास ॥ कीं त्या जीर्ण मशीदीस । रूप गोंडस आणावे ॥ १२१ ॥ मशिदीचाही जीर्णोद्धार व्हावा आपुले हस्तें साचार ॥ भक्त गोपाळ गुंडाचा निर्धार । पाषाण तयार करविले ॥ १२२ ॥ परी हा जीर्णोद्धार योग । नव्हता वोटे गुंडाचा भाग ||
या विशिष्ट कार्याचा सुयोग आला मना जोग पुढावा ॥ १२३ वाटे बाबांच्या होतें मनीं । करावें हें कार्य नानांनी ॥ ।
फरसबंदी मागाहुनी । करावी कौकांनी तदनंतर ।। १२४ ॥
१- नानासाहेब चांदोरकरांनी २- काकासाहेब दीक्षित
श्रीसाईसच्चरित अध्याय ६ वा.
१२१
तैंसेंच पुढे घटूनि आलें । आधीं आशा मागतां थकले || म्हाळसापतीस मध्यस्ती घातले। अनुमोदन दिधलें बाबांही ॥ १२५ ॥
असो जेव्हां मशिदीसी । निशींत एका झाली फरसी ॥ तेथून मग दुसरेच दिवशीं । बाबा गादीसीं बैसले ॥ १२६ ॥ अकरासाली सभामंडप । तोही प्रचंड खटाटोप || केवढा तरी महाव्याप । जाहला थरकांप सकळिकां ।। १२७ ।।
तेंही कार्य येच रीती । ऐसीच सकल परिस्थिति ॥ असतां पूर्ण केलें भक्तीं । एके रात्रीत सायासें ॥ १२८ ॥ रात्रीं प्रयासें खांब दाटावे । सकाळीं बाबांनीं उपटू लागावें ॥ अवसर साधूनि पुन्हा चिणावे । ऐसें शिणावें सकळिकीं ।। १२९ ॥ सर्वांनीं घालावी कास । करावा रात्रीचा दिवस ॥ पुरवावा मनाचा हव्यास । अतिमायास सोसुनी ॥ १३० ॥ आधीं येथें उघडें आंगण होतें इवलेंसे पटांगण ॥ सभामंटपा योग्य स्थान । जाहलें स्फुरण दीक्षितां १३१ ॥ लागेल तितुका पैका लावून । लोहाचे खांब कैच्या आणून ॥ बाबा चावडीस गेलेसे पाहून । काम हैं साधून घेतलें ॥ १३२ ॥
।
१ एक सोनार ज्ञातीतील बाबांचें परम भक्त होते.
२ साईबाबा एकरात्र मशिदीत आणि एक रात्र जवळच्या सरकार चावर्डीत रहात आणि पुन्हा दुसरें दिवशी सकाळी मशिदीत परत येत. अशी त्यांची नित्याची वहिवाट असे. ते रात्री सुमारें ९ वाजतां चावडत पुष्कळ भक्त मंडळीसह वाजत गाजत असे जात. ते मशीदीचे कंपा- ऊंडाबाहेर पडले की रात्र या मंडपाचे कामाला सुरुवात व्हावी.
१२२
श्रीसाई लीला.
भक्तांनीं रात्रीचा करावा दिवस । खांब चिणावे करूनि सायास चावडींतून परतण्याचा अवकाश । लागावें उपटण्यास बाबांनीं ॥ १३३ ॥ एकदां अत्यंत कोपायमान । एका हातीं तात्यांची मान ॥ दुजियानें एका खांबास हालवून | उपटून काढू पहात ॥ १३४ ॥ हाल हालवून केला ढिला । तात्यांचे माथ्याचा फेटा काढिला । कांडे लावून पेटवूनि दिला । खड्ड्यांत टाकिला त्वेषानें ॥ १३५ ॥ तया समयींचे ते डोळे - दिसत जैसे अनल गोळे || सन्मूख पाहील कोण त्या वेळे । धैर्य गेलें सकळांचें ॥ १३६ ॥ लगेच खिशांत हस्त घातला । रुपया एक बाहेर काढिला । तोही तेथेंच निक्षेपिला | जणो तो केला सुमुहूर्त ॥ १३७ ॥ शिव्या शापांचा वर्षाव झाला | तात्याही मनीं बहु घाबरला ॥ प्रसंग बहु विकट आला | प्रकार घडला कैसा हा ॥ १३८ ॥ जन लोक विस्मयापन्न । हें काय आज आहे दुश्चिन्ह || तात्या पाटिलावरील हे विघ्न । होईल निवारण कैसें कीं ॥ १३९ ॥ भागोजी शिद्यानें धीर केला । हळू हळू पुढे सरकला || तोही आयताच हातीं सांपडला । यथेष्ट धुमसिला बाबांही ॥ १४० ॥
१ तात्या गणपत कोते पाटील - बायजाबाईचे चिरंजीव.
२ याचें मुख हस्तपादादि सर्व अवयव महाव्याधीने ग्रस्त असल्यामुळे लोक याचे वान्यास उभे रहात नसत तथापि हा बाबांचा इतका भक्त होता की बाबा मशीदीत असतां नित्य सकाळी आपल्या हातापायास तळव्यापासून कोपरा ढोपरा पर्यंत याचे पासून तूप चोळवून घेत आणि मशीदीपासून लेंडी पर्यंतच्या सकाळचे नित्याचे फेरीत हाच साईबाबांवर एका हाताने छत्री धरून व दुसरे हाताने पाण्याने भरलेले टमरेल घेऊन बाबांचे बरोबर लेडीयर जात येत असे.
श्रीसाईसच्चरित अध्याय ६ वा.
१२३
माघवेरावही हाती लागले । तेही विटांचा प्रसाद पावले ॥ जे जे मध्यस्ती करावया गेले । वेळींच अनुग्रहिलें बाबांही ॥ १४१ ॥ बाबांपुढे जाईल कोण । केवीं तात्याची करावी सोडवण ॥ म्हणतां म्हणतां क्रोधही क्षीण । झाला शमन बाबांचा ॥ १४२ ॥
तात्काळ दुकानदार बोलाविला । जरीकांठी फेटा आणविला ॥ स्वयें तात्याचे डोक्यास बांधिला । शिरपाव दिधला जणु त्यास॥ १४३॥ आश्चर्यचकित लोक झाला । काय कारण या रागाला ॥ किमर्थ तात्यावरी हा हल्ला । केला गिल्ला बाबांनीं ॥ १४४ ॥ कोपास चढले किंनिमित्त । क्षणांत पाहतां प्रसन्नचित्त ॥ यांतील कारण यत्किंचित । कोणासही विदित होईना ॥ १४५ ॥ कधीं असत शांत चिच । प्रेमें गोष्टी वार्ता वदत ||
कधीं न लगतां निमिष वा निमित्त । क्षुब्ध चित्त अवचित ॥ १४६ ॥ असो ऐशा या बाबांच्या गोष्टा । एक सांगतां एक आठवती ॥ सांगू कोणती ठेवूं कोणती । प्रपंच वृत्ति बरवी ना ॥ १४७ ॥ करवे न मजही आas free । जैसी जिला मिळेल सवड ॥
आवड निवड
तेंसी ती श्रोतियांची होड । श्रवण कोड पुरवील ॥ १४८ ॥
पुढील अध्यायीं करावें श्रवण । वृद्ध पुखश्रुत पूर्वकथन || साईबाबा हिंदू कीं यवन । करूं निरूपण यथामति ॥ दक्षिणामिषे घेऊन पैसा । जीर्णोद्धारार्थ लाविला कैसा ॥ धोती पोती खंडदुखंडसा । देह कैसा दंडीत ॥
1
१ माधवराव देशपांडे यांजवर बाबांचे अत्यंत प्रेम असे. लडिवाळपणानें बाबांस अरे तुरे म्हणण्याची सलगी दुसऱ्या कोणाच्याही नशिबी नव्हती.
१२४
श्रीसाई लीला.
कैसे परार्थ वेठीत कष्ट । निवारीत भक्त संकट ॥ पुढील अध्याय होईल स्पष्ट । श्रोते संतुष्ट होतील ॥ इति श्रीसंतसज्जन प्रेरिते । भक्त हेमाडपंत त्रिरचिते ॥ श्रीसाईसमर्थ सच्चरिते । रामजन्मोत्सवादिकथनं नाम ||
-- शष्टोध्याय: संपूर्ण:
श्री साईनाथार्पणमस्तु शुभभवतु.
N
पोंच व अभिप्राय
श्री रामदास आणि रामदासी या प्रसिद्ध मासिकाचे ८ व्या वर्षाचे पहिले दोन अंक (८५ व ८६) "परत भेट व अभिप्रायार्थ" व्यवस्थापकांनी आमचेकडे पाठविले याबद्दल आम्ही त्यांचे फार ऋणी आहोंत. श्री साईं- लीला त्यांनां दर महिन्यास भेट देऊन हा परस्पर भेटीचा व्यवहार कायम ठेवीलच. श्री रामदास आणि रामदासी हे मासिक जसें केवळ श्री सम- थांच्या लीला व त्यांचे वाङ्मय जतन करण्याच्या उद्देशाने निघालेलें आहे तसच श्री साईलीला हे मासिकही केवळ श्री सद्गुरु साईबाबांच्या टीला व त्यांची बोधवचनें जतन करण्याच्या उद्देशानेंच निघालेले आहे. एकाच हेतूने प्रेरित होऊन निघालेल्या अशा या दोन मासिकांचा भेटीचा योगा- योग होणें ही त्या दोन्हीं समर्थांचीच टीला समजली पाहिजे.
अंक ८६ मध्ये चिटणीसांनी वर्णिलेली या मासिकाची "दैना " पाहून मनास एक प्रकारची उद्विग्नता आल्याशिवाय रहात नाहीं. राम- दासी हा पंथ फार मोठा आहे व श्री समर्थ सेवक अगणित आहेत. असें असूनही केवळ श्री समर्थानां वाहिलेल्या या मासिकासंबंधीं महाराष्ट्राची इतकी उदासवृत्ति असावी व आठ वर्षांत खर्च चालण्यास पुरेसे वर्गणी- दार मिळू नयेत हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाहीं. वार्षिक वर्गणी अवधी रुपये तीन असून भगाऊ कार्डे पाठविलीं असत, १०० ग्राहकांची व्ही.पी., परत व्हावी ही स्थिति अत्यंत शोचनीय आहे. " स्वराज्याची आकांक्षा करणाऱ्या तरुण महाराष्ट्रीयांनी " इकडे अवश्य लक्ष द्यावे अशी आमची त्यांना कळकळीची विनंति आहे.
या दोन्ही अंकांत आलेला रा. भास्कर वामन भट यांचा "महाराष्ट्र धर्म " हा लेख ऐतिहासिक दृष्टीनें फार सुंदर आहे, परंतु आमच्या दृष्टीनें
धासाइलाला-
तो या मासिकांत अस्थानी बाटतो. श्री ममची जन्मा
मनोरंजक तसाच मार्मिक आहे. सम
जन्मभू
लाभ न घटणान्या श्री समर्थ क्
झाल्यासारखं वाटेल. आंबेत श्री समर्थांच्या जन्मभूमीवर श्री मंदीर बांधण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे हा महारानी आपले औदासिन्य सोडून पथाशक्ति हमारा
तो
याचा
चालू वर्षांपासून 'श्री समर्थकृताखावरी हे अलीकडप्पा काव्यलोलुप मंडळीना ही पदाचित
संगम आहे. परंतु मुमुक्षु आर्थिक मं
अती
पश्तक श्री स्वामी ना श्री मीना
म
अनंत आत्माराम मोरमकर यांनी
आ तवं